माळेगाव ! सायबर सेल पुणे ग्रामीण यांच्या मदतीने माळेगाव येथील हरवलेल्या...त्या इसमाचा शोध लागला.
माळेगाव - माळेगाव पोलीस स्टेशन येथील गोसावी वस्ती येथील युवक जितेंद्र तुकाराम दरेकर हा घरात कोणासही काही न सांगता घरातून निघून गेला त्याप्रमाणे माळेगाव पो स्टे मानव मिसिंग रजि नं -03 /22 अन्वये दाखल करणेत आली व लागलीच मा पोलीस निरीक्षक यांनी तपास करण्याचे आदेश दिले त्याप्रमाणे मा पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सायबर शाखा पुणे येथून मोबाईल नंबर चे cdr आणि मिसिंग व्यक्तीच्या मोबाईल चे लोकेशन पोलीस निरीक्षक खानापूरे , पोलीस अंमलदार पाटील, सायबर सेल, पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण यांच्याशी संपर्क साधून तात्काळ लोकेशन प्राप्त केले त्याप्रमाणे त्याचे लोकेशन दौंड रेल्वे स्टेशन येथे येताच दौंड पोलीस स्टेशन येथील पोलीस अंमलदार निखिल जाधव यांचे मदतीने रेल्वे स्टेशन परिसरात सदर मिसिंग इसमाचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेऊन माळेगाव पोलीस स्टेशन येथे आणून त्याचे कुटुंबातील नातेवाईकांचे ताब्यात देणेत आले आहे .
सदरची कामगिरी मा पोलीस निरीक्षक किरण अवचर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सादिक सय्यद ,पोलीस अंमलदार राहुल पांढरे ,विजय वाघमोडे ,नंदू गव्हाणे यांनी केली आहे.