जेजुरी ! जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने "आदर्श पत्रकार" पुरस्काराने रमेश लेंडे सन्मानित.
जेजुरी - भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्हाध्यक्ष तसेच दैनिक पुण्यनगरी जेजुरी प्रतिनिधी रमेश लेंडे यांना पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने "आदर्श पत्रकार" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
पत्रकारितेतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून नावलौकिक मिळवणारे दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेेेेक सामाजिक, शैक्षणिक तसेच विविध समाजाच्या समाज हिताचे विषय आपल्या लेखणीच्या जोरावर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम पत्रकार लेंडे यांनी केले आहे.जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने "आदर्श पत्रकार" पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांनी संघटना पदाधिकारी यांचे आभार मानले.