CRIME NEWS नात्याला काळींबा फासणारी घटना...सख्ख्या भावानेच घेतला भावाचा जीव... माळेगाव येथील घटना.
माळेगाव:बारामती तालुक्यातील माळेगाव येथे एका कुटुंबातील सख्खा भाऊच पक्का वैरी झाल्याचे पाहिला मिळाले आहे. माळेगाव मध्ये काल रात्री भावानेच भावाची चाकूने भोकसून हत्या केल्याची घटना माळेगाव मध्ये समोर आली आहे. कल्पेश अरुण धुळप (वय २६) रा. रो. हाऊस नं.२ तावरे पेट्रोल पंपामागे अमरसिंह कॉलनी माळेगाव असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून आई सुरेखा अरुण धुळप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याचा सख्खा भाऊ मंथन अरुण धुळप याला माळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मागील आठ दिवसापूर्वी चप्पल व्यवसाय करता दिलेले एक लाख ४० हजार रुपये काय केले असा आरोपीने जाब विचारला असता मयत कल्पेश याने सदरचे पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केले आहेत.आता माझ्या खात्यावर पैसे नाहीत मी नंतर पैसे देतो असे म्हणाला असता आरोपी मंथन हा त्याच्यावर रागावला त्यामुळे कल्पेश याने मंथन यास हाताने बुक्क्याने छातीवर मारहाण केली असता आरोपी मंथन याने घरातील कपाटातील चाकू काढून कल्पेश याचे मानेवर तसेच छातीवर चाकूने वार करून त्याचा जागीच खुन केला. या घटनेने माळेगाव परिसरात घबराट पसरली असून माळेगाव पोलिसांनी घटना घडताच घटनास्थळी जात आरोपीला अटक केली आहे.