बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाची मनमानी...
बारामती(दिगंबर पडकर)..बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक मोटार वाहन निरीक्षक कार्यालयात आपल्या सोयीस्कर वेळेनुसार कधीही येतात.व कधीही जातात.ते गेल्या तीन वर्षांपासून राज्याचे राज्यपाल यांच्या अध्यादेशानुसार शासकीय वेळेत सकाळी ९,४५ वाजता कधीच उपस्थित नसतात.शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला असूनही ते आपल्या अधिकाराचा हुकूमशाही पद्धतीने मनमानी पणे गैरवापर करून वाहनांच्या योग्यताप्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी दुपारी १,३० वाजल्यानंतरच मेडद येथील ब्रेकटेस्ट ट्रकवर जातात.आज दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ रोजी ते दुपारी ३,३० मिनिटांनी वाहनांच्या योग्यताप्रमाण पत्रांची तपासणी करण्यासाठी आले.वाहन मालक सकाळी १० वाजल्यापासून मोटार वाहन निरीक्षकांची वाट पाहात उपाशी तापाशी,उपाशीपोटी बसले होते.मोटार वाहन निरीक्षक आले ३,३० वाजता व वाहनांची तपासणी दोन,अडीच तासात करून निघून गेले.ते बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालय प्रमुख पुणे येथे मिटिंगसाठी गेले होते.तरी सुद्धा ते कार्यालयातही उपस्थित नव्हते.परंतु कार्यालय प्रमुख हे पुणे येथील मिटिंग करून बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुपारी एक वाजता पोहचले.जनतेची कामे मार्गी लावली.मग हे मोटार वाहन निरीक्षक दुपारी ३,३० वाजेपर्यंत कोठे होते याची चर्चा बारामती,इंदापूर,दौंड तालुक्यातून आलेले वाहन मालक चालक करीत होते.
■■■■■■■■■■■
संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून माहिती घेतो. नागरिकांच्या काही समस्या असल्यास त्या तात्काळ सोडविल्या जातील.
राजेंद्र केसकर
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती.