सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी शारीरिक व मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान संपन्न
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील मु.सा.काकडे महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी 'किशोरवयीन विद्यार्थिनींचे मानसिक व शारीरिक आरोग्य' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून समीक्षा संध्या मिलिंद यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. देविदास वायदंडे सर होते.
या प्रसंगी समीक्षा मॅडम यांनी किशोरवयीन वयातील विद्यार्थिनींमध्ये शारीरिक व मानसिक बदल कसा होत असतो याविषयी बहुमूल्य असं मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी प्रश्न संवाद साधला.व विद्यार्थिनींनी सुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुजाता भोईटे, उपप्राचार्या डॉ.जया कदम, उपप्राचार्य प्रा.रवींद्र जगताप पर्यवेक्षिका सणस मॅडम, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृणालिनी मोहिते यांनी केले, तर प्रास्ताविक सारिका होळकर आणि परिचय वनिता कांबळे यांनी केले, तर अर्चना पवार यांनी आभार मानले.