वाल्हे ! वाल्मिकी विद्यालयात स्नेह संमेलन उत्साहात
वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ
पुरंदर तालुक्यातील वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयात १६ वर्षापूर्वी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात पार पडले.यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास भेटवस्तू तसेच शालेय आवारात वृक्षारोपण करून समाजापुढे आगळावेगळा आदर्श निर्माण केला.
शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापित केलेल्या वाल्हे येथील महर्षी वाल्मिकी विद्यालयात आजवर हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे धडे घेतले आहेत .त्यातील अनेक माजी विद्यार्थी समाजात चांगल्या पदावर कार्यरत देखील आहेत.परंतु अशा विद्यार्थ्यांच्या शालेय आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने शाळेचे माजी विद्यार्थी व शिक्षक वर्गाकडून नेहमीच या ठिकाणी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
यावेळी सन २००५ ते २००६ यां कालावधीत इयत्ता १२ वी मध्ये सुयश मिळवणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी व त्यावेळच्या शिक्षकांकडून स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या संमेलनात जवळपास १६ वर्षानंतर एकमेकांना भेटलेल्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा करून भविष्याच्या वाटचालीवर देखील सखोल चर्चा केली.अशातच माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तसेच महिला शिक्षकांना देखील साडी चोळी भेट देऊन त्यांचा विशेष सन्मान केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अब्दुल पठाण पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार यांसह अर्जुन वारे सुरेश रासकर हनुमंत भंडलकर रमेश शेवते योगिनी शेवते आदी शिक्षकांसह सागर भुजबळ, ललिता अनपट, गणेश रासकर, निलेश पवार, सुधीर पवार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुर्यकांत भामे सूत्रसंचालन शरद जाधव तर उपस्थितांचे आभार तुषार जगताप यांनी मानले.