आठवणीत रंगला माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा..!
अनावश्यक खर्च टाळत शाळा परिसर सुशोभीकरणासाठी केली आर्थिक मदत
"आवडते मज मनापासुनी शाळा,
लाविते लळा जशी माऊली बाळा"..!
सोमेश्वरनगर - शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीर बारामतीतील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे, न्यू इंग्लिश स्कूल पांढरवस्ती वाकी चोपडज कानडवाडी इयत्ता दहावी इ. सन २००२-२००३ बॅच स्नेह मेळावा संपन्न झाला.
या वेळीसंस्थेचे संचालक बापूराव गाडेकर तसेच प्रमुख पाहुणे माजी मुख्याध्यापक आर एन भंडलकर आणि ज्येष्ठ शिक्षक के जी जगताप उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये इ.सन २००२-२००३ बॅच स्नेह बॅचमधील उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत ते व्यक्त केली तसेच माजी मुख्याध्यापक भंडलकर सर तसेच विद्यमान मुख्याध्यापक इनामदार आणि त्यावेळे असणारे वर्गशिक्षक फरांदे सर यांनी मार्गदर्शन केले. बॅचमधील कुठलाही विद्यार्थी चुकीच्या मार्गानी न जाता आपल्या क्षेत्रात नावलौकीक मिळवत असल्याचा आम्हाला अभिमान आहे असे फरांदे सर कार्यक्रम प्रसंगी बोलताना म्हणाले. बॅचमधील विद्यार्थी शिक्षक, इंजिनीयर, सैनिक, पोलीस, सामाजिक, राजकीय, शेती आणि दुग्ध तसेच सिविल कॉन्ट्रॅक्टर, उद्योजक, अशा क्षेत्रात कार्यरत आहेत. भंडलकर सर यांनी मैत्री जपा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असं मोलाच संदेश दिला.
यावेळी कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . बॅच च्या वतीने सर्व शिक्षक गुरुजनांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सप्रेम भेट देऊन सन्मान केला तसेच शाळेच्या वतीने देखील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन महेंद्र जगताप यांनी केले तर इ.सन २००२-२००३ बॅचच्यावतीने शाळेतील सुशोभीकरण साठी तीस हजार रुपयाची आर्थिक देणगी स्वरूपात दिली असल्याचे आभार प्रसंगी अनिल भंडलकर यांनी सगीतले.