Type Here to Get Search Results !

कऱ्हानदी पुलावरील अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने स्विफ्ट गाडी गेली वाहून

कऱ्हानदी पुलावरील अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहाने स्विफ्ट गाडी गेली वाहून
 
बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे मंगळवारी ११रोजी  लोणी भापकर येथील  एका  वैद्यकीय व्यवसायिकाची चार चाकी गाडी (स्वीप्ट) कऱ्हा  नदीपत्रात वाहून गेली. नदी पार करत असताना पुलावरुन वाहणाऱ्या  पाण्याचा अंदाज न आल्याने ही गाडी वाहून गेली.मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही.

मंगळवारी दि ११ रोजी लोणी भापकर येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ . बारवकर हे  काऱ्हाटी  येथील आपला दवाखाना बंद करून घरी जात होते . काल तालुक्यातील मोरगाव, तरडोली , आंबी,  माळवाडी , बाबुर्डी आदी भागात सर्वदुर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. यामुळे नदी वाहू लागली होती . बारवकर हे  नदी पात्रावरील पूर पार करत  असताना नदीपात्राच्या मध्यभागी आले असता आणि पाण्याचा ओघ आणखी वाढला.

यामुळे  पुलावरून गाडी वाहून लागली. यादरम्यान त्यांनी  गाडीतून उडी मारल्याने ते थोडक्यात बचावले.  यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.  नदीपात्रातील पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही नदीपत्रात न जाण्याचे आव्हान महसूल खात्याच्या वतीने गावकामगार तलाठी श्याम झोडगे  यांनी  केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test