Type Here to Get Search Results !

मिशन वात्सल्य’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या कार्यशाळेचे उदघाटन.

'मिशन वात्सल्य’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या कार्यशाळेचे उदघाटन.
पुणे, दि. १८ : मिशन वात्सल्यअंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ तसेच ‘कारा’ दत्तक नियमावली २०२२ या विषयावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन राज्याच्या महिला व बालविकास आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते करण्यात आले.

हॉटेल अरोरा टॉवर्स येथे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व जिल्हा संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) व विशेष दत्तक संस्थेचे प्रतिनिधी यांच्यासाठी आयोजित या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी नवी दिल्ली येथील केंद्रीय दत्तक ग्रहण संसाधन संस्थेच्या (कारा) संचालक डॉ. जगन्नाथ पती, बालविकास उपायुक्त राहुल मोरे, बाल संरक्षण कार्यक्रम व्यवस्थापक मनिषा बिरारीस, कारा संस्थेचे प्रतिनिधी श्रीमती इंदू वर्माती, महाराष्ट्र राज्य दत्तक स्त्रोत संस्थेचे (सारा) कार्यक्रम अधिकारी छाया म्हंकाळे, विजय विभाड आदी उपस्थित होते.

श्रीमती विमला म्हणाल्या, कार्यशाळेत बाल न्याय व्यवस्थेतील कायदे, दत्तक नियमामधील झालेला बदल, बाल न्याय कायद्याच्या अनुषंगाने कार्यशाळेत सहभागी घटकांची भूमिका आणि जबाबदाऱ्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कायदा व नियमांचे सर्वांगीण ज्ञान आत्मसात करावे. बाल न्याय, संरक्षण तसेच दत्तकप्रक्रियाबाबत अधिकाऱ्यांना चांगल्याप्रकारे करण्याची संधी आहे. याबाबत आपल्यास्तरावर येणाऱ्या शंकाचे निरसन काराच्या प्रतिनिधींकडून करुन घ्यावे, असे त्यांनी उपस्थितांना सांगितले.

दत्तक प्रक्रियेत होत असलेला विलंब टाळण्यासाठी ही प्रक्रिया न्यायालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. ही प्रक्रिया राबविताना प्रत्येक भागधारकाची जबाबदारी व त्यांच्या भूमिकेत झालेला बदल याबाबत या कार्यशाळेत सविस्तरपणे मागदर्शन करण्यात येणार असून याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे, अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test