वाघळवाडी...चोपडज येथे वन्यजीव सप्ताह वनविभागाच्या वतीने संपन्न.
सोमेश्वरनगर - वन्यजीव सप्ताह निमित्त उपवनसंरक्षक पुणे सो.राहुल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक सो.मयूर बोठे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांचे मार्गदर्शनाखाली आज सकाळी मौजे. वाघळवाडी येथील सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांना वाघळवाडी मधील राखीव वनक्षेत्रात फिरती करून वन्यप्राण्यांची माहिती जनजागृती करण्यात आली. व दुपारी बारामतीतील मौजे. चोपडज येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे पथनाट्यच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वन्यप्राण्याबाबतची माहिती व जनजागृति करण्यात आली. यावेळी प्रकाश चौधरी वनपाल करंजे व योगेश कोकाटे वनरक्षक करंजे आणि नंदलाल गायकवाड, दादा जाधव, अविनाश नाईक, सचिन जाधव, नवनाथ रासकर वनसेवक व शिक्षक उपस्थित होते.