परतीच्या पावसाचा "सोमेश्वर" भागात चांगलाच धुमाकूळ.
सोमेश्वरनगर - परतीच्या पावसाने बारामती शहर व तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी संध्याकाळी सुरु झालेला पाऊस रात्रभर रिपरिप चालू होती निरा, मुर्टी, जोगवडी, मोरगाव भागात ढगफुटी दृश्य पाऊस झाला तर मंगळवार रोजी करंजेपुल व मुर्टी आठवडे बाजार अक्षरशः पाण्याखाली गेले तर मुर्टी परिसरात ढगफुटी पाऊस झाल्याने तेथिल काही व्यापाऱ्यांचा भाजीपाला, धान्य वाहून गेले आहे. अचनकच्या पाऊसाने या बाजरतळत पाणी गूसल्याने अख्ख्या आठवडे बाजाराची वाट लागणी असून व्यापारी सह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आज (बुधवार) सकाळीच पावसाने हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट पावसाने जोरदार बॅटींग केली. शेतातील ताली भरल्या असून, करंजे ओढयाला पुलावरून पाणी चालले असल्याने करंजेभागाचा सोमेश्वर चा संपर्क तुटला आहे तसेच परिसरतील अनेक गावांमध्ये असणारे ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत. शेतात पाणी साचले आहेत रात्रीपासून पाऊस सुरू असल्याने नागरिकांना घरातून बाहेर पडता आलेले नाही. पावसाने धुमाकूळ घातल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.
परतीच्या पावसाने बारामती तालुक्यात चांगली हजेरी लावलेली आहे. या पावसामुळे ऊस पिकाला फायदा होत असला तरी तरकरी पिकांना रोगराईची बाधा होण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.