'राष्ट्रनेता ते लोकनेता'सेवा पंधरवडा मोहिमेअंतर्गत तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यासाठी...या दिवशी शिबीराचे आयोजन.
पुणे - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातर्फे राष्ट्रनेता ते लोकनेता सेवा पंधरवडा कालावधीत विशेष मोहिमेअंतर्गत तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र देण्यासाठी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिबिराबाबत सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांच्या उपस्थितीत तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व तृतीयपंथीयांना ओळखपत्र देण्याचा प्रयत्न असल्याचे श्रीमती डावखर यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित शिबीरास उपस्थित राहून
National Portal For transgender Persons
https://transgender.dosje.gov.in/
या राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.