बारामती ! बारामती आरटीओ कार्यालयामार्फत चालक दिन साजरा.
बारामती (दिगंबर पडकर ): बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी चालक दिन साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने कोविड काळामध्ये ज्यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून दुसऱ्यांचे जीव वाचवले असे महिला ग्रामीण रुग्णालय बारामती येथील ॲम्बुलन्सचे चालक यांचा सत्कार आणि प्रबोधन करून त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
तसेच एमआयडीसी येथील एसटी डेपो येथील एसटी चालकांचा गौरव करण्यात आला व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांच्या मार्गदर्शनाखाली चालक दिन साजरा करण्यात आला यावेळी आरटीओ इन्स्पेक्टर सुरज पाटील,प्रज्ञा ओमासे प्रियंका कुंडले उपस्थित होत्या. आरटीओ अधिकारी सुरज पाटील यांनी प्रबोधन करून चालकांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमात बारामती येथील श्रीराम ड्रायव्हिंग स्कूलचे योगेश खोपकर यांनी सहभाग घेतला
[9/17, 9:24 PM] काका: दिगंबर पडकर नावाने बातमी घ्यावी ही विनंती