आज पहाटे वीर धरणातून ... निरा नदी पत्रात ... विसर्ग सुरू
वीर धरण शाखा : दिनांक - 17/09/2022. वेळ - पहाटे 5.30 वाजता सध्या वीर धरणाच्या उजवा कालवा विद्युतगृहातुन 1100 Cusecs व डावा कालवा विद्युतगृहातुन 900 Cusecs विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
■ वीर धरणाच्या सांडव्यातून आज पहाटे 5.30 वाजता 23185 Cusecs विसर्ग कमी करून 13911 Cusecs इतका विसर्ग करण्यात आला आहे.
■ नीरा नदीपात्रात एकूण 15911 Cusecs विसर्ग सुरू आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. तरी सर्वांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.