सोमेश्वरनगर ! वृक्षारोपण करत संचालक ऋषिकेश गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
सोमेश्वरनगर - बारामतीतील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ऋषिकेश गायकवाड यांचा वाढदिवस आजी माजी सैनिक संघटना कार्यालय आवारात बुधवार दि. 21 रोजी
वृक्षारोपण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आजी माजी सैनिक संघ अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर, सचिव पंकज कारंडे, कार्याध्यक्ष नितीन शेंडकर,गणेश शेंडकर, अँड गणेश आळंदीकर ,रविंद्र कोरडे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर, हरबल लाईफ क्लबचे ओकर जगताप, विवेकानंद अभ्यासिका अध्यक्ष गणेश सावंत,करंजेपुल माजी उपसरपंच निलेश गायकवाड,युवा नेते उद्योजक सागर गायकवाड, सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी सदस्य हरीश गायकवाड, सुरज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.