Type Here to Get Search Results !

तरडोलीचा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला ; शेकडो हेक्टर शेतजमीनीला होणार फायदा.

तरडोलीचा पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला ; शेकडो हेक्टर शेतजमीनीला फायदा.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील तरडोली येथील पाझर तलाव  दि. ८  रोजी सकाळी पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे या तलावर अवलंबून असलेल्या पाच गावांच्या विहीर  नळ पाणी योजना पुन्हा कार्यान्वित  होणार असून परिसरातील शेकडो हेक्टर  शेतजमीनीला सिंचनाला याचा फायदा होणार आहे.

 तरडोली ता. बारामती येथील पाझर  तलावावर तरडोली, मासाळवाडी, माळवाडी, बाबुर्डी, मोरगाव (काही भाग)  या गावांच्या पिण्याच्या  नळ पाणी योजना अवलंबून आहेत. नाझरे धरण क्षेत्र , मोरगावसह परीसरात सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे  पाझर तलाव  पुर्ण क्षमतेने  भरला आहे . तसेच सांडव्यावरुन पाणी वाहण्यास सुरवात झाली असून  तब्बल दोन वर्षांनी तलाव भरला आहे . तलावातील पाण्याचे  जलपूजन आज जिल्हा परिषदेचे मा. अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच विद्या भापकर, सोमेश्वर कारखान्याचे संचालक किसन तांबे,  जिरायती भाग पाणी परीषद अध्यक्ष हनुमंत भापकर , माजी सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौधरी, संजय भापकर दत्तात्रय पुणेकर ,  सतीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

 पावसामुळे तलाव  भरला असल्याने तरडोलीसह परीसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तसेच तलावामुळे परीसरातील विहरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे . या परिसरातील कमी झालेले ऊसाचे क्षेत्र पुन्हा  वाढण्यास  मदत  होणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्गातून  आनंद व्यक्त होत आहे .

तरडोली पाझर तलाव  भरताच काल दि ८ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तलावाची प्रत्यक्ष भेट देऊन पहाणी केली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test