"बहुजन समाजसेवा संघ करंजे"वाचनालयास युवानेते गौतम काकडे-देशमुख यांचा 'एक हात मदतीचा'
सोमेश्वरनगर - बारामतीतील बहुजन समाज सेवा संघ करंजे यांच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम अनेक राबविले जातात , करंजे व पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यां साठी हे वाचनालय सुरू केले असून याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावे असेही नम्र आवाहन संघमार्फत केले आहे ,यामध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध व्हावी म्हणून बहुजन समाजसेवा संघ करंजे वाचनालय" या नावाने श्री गणेश चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक ३१ रोजी उपस्थित मन्यावरच्या हस्ते हे वाचनालय सुरू करण्यात आले
यामध्ये स्पर्धापरीक्षेत उपयुक्त अशी पुस्तक उपलब्ध आहेत काही बाकी आहेत तसेच वाचक विध्यार्थी साठी इतर साहित्य साठी आर्थिक सहाय्य लागणार असल्याने परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी " एक हात मदतीचा" द्यावा असे नम्र आव्हाहन संस्थापक अध्यक्ष पोपट हुंबरे यांनी केले होते, या कामे चांगला प्रतिसाद मिळत असून सोमेश्वर पंचक्रोशीतील युवा नेते म्हणून ज्यांची ओळख आहे व ते नेहमीच कोणतीही मदत असो नेहमी आपणहून त्या कामी अग्रेसर असतात असे युवा नेते उद्योजक गौतमभैया काकडे-देशमुख यांनी वाचनालयाच्या पुस्तक व इतर साहित्य साठी आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये देत त्यांनी वाचनालयास " एक हात मदतीचा" ही संकल्पना जोपासली आहे.
या मदतीबद्दल संस्थापक अध्यक्ष पोपट हुंबरे व कार्याध्यक्ष विनोद गोलांडे सह सर्व संघातील सदस्यामार्फत त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तर गौतमभैया काकडे यांनी बहुजन समाजसेवा संघ यांचे काम कौतुकास्पद आहे व वाचनालयात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या अभ्यासासाठी वाचनालयाचा फायदा घेत सोमेश्वर पंचक्रोशीतील मोठमोठ्या पदावर विराजमान व्हावे व परिसराचे आणि कुटुंबाचे नावलौकिक करावे असेही त्यांनी बोलताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.