...त्या गावातील गणेश मंडळाने चक्क श्री गणेशाची सायकलवर स्वारी विराजमान बाप्पा देत आहे देशभक्तीचा संदेश.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील एका गणेश मंडळाने चक्क श्री गणेशाची सायकलवर स्वारी करीत विराजमान झालेली बाप्पाची मुर्ती देशभक्तीचा संदेश देणारी साकारलेली असून सर्वत्र आकर्षणाचा विषय ठरलेली आहे
गणेशोत्सव म्हटले की सर्वत्र आनंदाला उधाण येते. यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा होतो आहे. राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळाला शासनाने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करीत सामाजिक तथा देशभक्तीचा संदेश देणारे देखावे साकारण्याचे आवाहन केले होते. दारव्हा येथील अंबिका नगरच्या ओम गणेश मंडळाने चक्क सायकल वर विराजमान गणेश मूर्तीची स्थापना करून आगळा वेगळा आदर्श निर्माण केलेला आहे. मूर्तिकार शशांक वानखडे यांनी सर्वांगसुंदर अशी श्री गणेशाची मूर्ती साकारली आहे. मंडळाने माजी सैनिक संजय गावंडे यांचे हस्ते मूर्तीची स्थापना करीत सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे. पेंटर खतीब यांनी देशभक्तीपर तैलचित्रे कुंचल्यातून साकारली असून,तैलचित्रामधून देशभक्तीचा संदेश दिलेला आहे. ओम गणेश मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यंदाही देशभक्तीचा जागर करीत "सायकल चालवा, पर्यावरण वाचवा" असा संदेश दिकेला आहे. या मंडळाने यागोदरही शेतकरी आत्महत्या, आतंकवाद, बेटी बचाव बेटी पढाव, वृद्धाश्रम, वृक्षारोपण, कोरोना जनजागृती आदी ज्वलंत विषयावर विलोभनीय दृश्य साकारत सामाजिक प्रबोधन केलेले आहे. याशिवाय गरजूंना ब्लँकेट वाटप, अन्नदान, वृक्षारोपण, देशभक्तीपर गीत आदी उपक्रम राबविलेले आहे. यावर्षी श्री गणेशाच्या मूर्तीची सायकलवर स्वारी करीत विराजमान झालेली मुर्ती यातून दिलेला देशभक्तीचा संदेश हा आकर्षणाचा विषय ठरलेली आहे.