मोरगाव ! अंगारकी चतुर्थी निमित्त मोरगावच्या मयुरेश्वराचे सत्तर हजार गणेशभक्तांनी घेतले दर्शन- विश्वस्त विनोद पवार
सोमेश्वरनगर - अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने बारामती तालुक्यातील मोरगाव येथील अष्टविनायक प्रथम तीर्थक्षेत्र मयुरेश्वर मंदिरात
गणपती बाप्पा मोरया ....मंगलमूर्ती मोरयाचा गजर सुरू होता...पहाटे पासूनच भक्तांनी श्रींच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत सुमारे सत्तर हजार भाविकांनी मयुरेश्वराचे दर्शन घेतले घेतले असल्याची माहीती चिंचवड देवस्थानचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .
आज मंगळावर दि १३ रोजी असणारी अंगारिकी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे पुजारी मंडळींनी मयुरेश्वराची प्रक्षाळ पूजा केली. त्यानंतर सकाळी सात वाजता येथील सालकरी विजय ढेरे यांनी श्रींची पूजा करून नैवेद्य दाखवला , अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे पाच वाजल्यापासूनच मयुरेश्वर मंदिर व प्रारंग गणेश भक्तांनी गजबजले होते. दरवर्षी पितृपक्षातील येणाऱ्या चतुर्थीला कमी प्रमाणात गर्दी होते. यामुळे दुपारपर्यंत मंदिरामध्ये कमी प्रमाणात गर्दी आढळून आली असली तरी दुपारनंतर पुन्हा मंदिर व परिसर भक्तांनी गजबजला. यामुळे मोरगावला यात्रेचे स्वरूप आले होते . दुपारी बारा वाजता मयुरेश्वराची पूजा चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली यानंतर श्रीस नैवेद्य दाखवण्यात आला. तसेच खिचडीचा महाप्रसाद सुरु करण्यात आला.
दिवसभर ऊन सावल्यांचा खेळ सुरूच असून होता. या चतुर्थीचे अनन्य साधारण महत्त्व असल्याने राज्यभरातून अनेक भक्त श्रींच्या दर्शनासाठी आले होते . आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरा समोरील बाजार पेठेतील दुकाने हार , दुर्वा , पेढे , श्रींच्या प्रतिमांनी गच्च सजवली होती. मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दुपारी बारा वाजता देवस्थानच्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आला होता. आज होणारी गर्दी लक्षात घेता चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने पिण्याचे पाणी, स्वच्छता, सुरक्षारक्षक आदी सोय केली होती.
तर वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी कुठलाही अनुचित अनुचित प्रकार न होण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. रात्री उशिरापर्यंत गर्दीचा ओघ सुरूच होता. सायंकाळी पाच नंतर मोरगावसह पंचक्रोशीतील भक्तांनी तुडंब गर्दी केली होती. आज विविध फुलांनी श्रींचा मुख्य गाभारा सजावट केली होती . श्रींच्या पूजेचा व फुलांनी सजावट केलेला हा फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. रात्रीच्या चंद्रोदयाच्या वेळी श्रींची पुन्हा पूजा करण्यात येणार आहे. यानंतर आरती व छबिण्याच्या कार्यक्रम होणार आहे अशीही माहिती देवस्थान यांनी दिली.