भारतीय पत्रकार संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पल्लवी प्रकाशकर पुरस्काराने सन्मानित
नंदुरबार जिल्ह्यातील युथ आयकॉन व भारतीय पत्रकार संघाच्या महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्ष पल्लवी प्रकाशकर यांना कोळी महासंघ नाशिक यांच्या वतीने "विशेष उत्तुंग भरारी सन्मान स्वकर्तृत्वाचा" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी नाशिक येथील कार्यक्रमात आमदार रमेश पाटील तसेच चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते पल्लवी प्रकाशकर यांना हा पुरस्कार देण्यात आला.
नंदुरबार जिल्ह्यातील युवा सामाजिक कार्यकर्त्या,तसेच उद्योजिका पल्लवी प्रकाशकर यांना सामाजिक कार्यासाठी असंख्य पुरस्कार आजवर मिळाले असून ,त्यांनी महिला आदिवासी समाज जनजागृती, सामुदायिक विवाह सोहळे,तसेच कोविड-१९काळात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.बालविवाह,बाल अत्याचार , ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण , ऊसतोडणी मजूर महिला यांच्या प्रश्नावर कार्य, आदिवासी भिल्ल समाजाचा विकासासाठी पल्लवी प्रकाशकर गेली १०वर्षे झटत आहेत.
आजवर त्यांना१५१पुरस्कार हे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातूनही मिळाले आहेत.
भारतीय पत्रकार संघाच्या महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी त्या विराजमान आहेत.
पल्लवी प्रकाशकर यांनी अवंतिका फाऊंडेशन शहादा नावाची सामाजिक चळवळ उभी करून महाराष्ट्रातच नव्हे तर देशाभरात कार्यरत आहेत.त्यांनी १४मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले असून शक्य तेवढी मदत त्या आदिवासी समाजासाठी करत आहेत.
या कार्याची दखल घेत कोळी महासंघ नाशिक यांच्या वतीने त्यांना विशेष उत्तुंग भरारी सन्मान स्वकर्तृत्वाचा या पुरस्काराने आमदार रमेश पाटील आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या सोहळ्याचे आयोजन वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते युवराज सैंदाणे यांनी केले होते यासाठी नितीन शेवरे व कोळी महासंघाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले .
या कार्यक्रमास कोळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अँड. चेतन पाटील, राजहंसजी टपके तसेच लक्ष्मण सावजी भाजपचे प्रदेश प्रवक्ते परशुराम वाघेरे,आदी मान्यवर उपस्थित होते.