सोमेश्वरनगर ! वाघळवाडी येथे एकता मित्र मंडळाच्या वतीने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन
सोमेश्वरनगर - गणेशोत्सवाच्या निमित्ताने वाघळवाडी येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.
एकता मित्र मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे गणेशोत्सवाच्या काळात गणेशमूर्तीची स्थापना केली जात आहे. दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून गणेशोत्सव साजरा केला जातो. मोतीबिंदू असलेले रुग्ण शोधून त्यांची शस्त्रक्रिया करण्याच्या दृष्टीने मोतीबिंदू शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये वाघळवाडी येथील ग्रामस्थांनी तसेच सोमेश्वरनगर परिसरातील वाणेवाडी, मळशी, निबुत, मुरूम, सोरटेवाडी, करंजेपुल आदी भागातून नागरिक तपासणी शिबिरात तपासणीसाठी उपस्थित राहिले. यावेळी दिडशे नागरिकांची तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे जरुरीचे आहे त्याच्या डोळ्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येतील नामानकीत अश्या 'बुधरानी' हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी रुग्णांना घरापासुन पुणे येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी जाण्या-येण्यासाठीच्या प्रवासाची व्यवस्था सुध्दा करण्यात येणार आहे. तसेच अल्प दरात चष्मे वाटप सुध्दा वाटप करण्यात आले.
मंडळाच्या वतीने परिसरात शिबिराची माहिती देण्यासाठी माहितीपत्रक तसेच गावागावात जाऊन ध्वनींपेक्षकावरून माहिती देऊन शिबिराचा लाभ घ्यावा अशी माहीती दिली होती. गणेशोत्सव काळात असे विविध समाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे एकता मित्र मंडळाच्या कार्यकर्ते बाळकृष्ण भोसले केतन भेस्के रोहित भेस्के देशराज भुजबळ निलेश बनकर गणेश शिंदे राहुल पवार सागर शिंदे ओंकार शिंदे सुहास मांढरे यांनी सांगितले.