बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा गाव संवाद दौरा
बारामती: दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नेपतवळण,शेरेवाडी, जळकेवाडी,वाकी, उंबरओढा, करंजे देऊळवाडी, माळशिखारेवाडी,बजरंगवाडी, म्हसोबानगर या महसुली गावांचा गाव संवाद दौरा करण्यात आला.
याप्रसंगी त्या भागातील नागरिकांच्या अडीअडचणी, प्रलंबित विकासकामे,चालू कामांचा दर्जा व इतर सार्वजनिक,वैयक्तिक गाव विकासाच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. गावांमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकासकामांच्या निधी व मदतीबद्दल त्यांचे विशेष आभार ग्रामस्थांनी मानले.
तसेच केंद्र व राज्य सरकारने विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हिताच्या विरोधी घेत असलेले निर्णय महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी.गॅस दरवाढ व चालू घडामोडी याबाबत सविस्तर चर्चा बैठकीमध्ये करण्यात आली.
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर,पुणे जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष विश्वासराव देवकाते, तालुका बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष धनवान वदक, बारामती दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, बारामती खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजीराव टेंगले,पंचायत समितीचे मा.गटनेते प्रदीप धापाटे,माळेगाव साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन तानाजी कोकरे,खरेदी-विक्री संघाचे संचालक विजय शिंदे, दूध संघाचे मा.चेअरमन वैभव मोरे,सोमेश्वर चे मा.संचालक लालासाहेब माळशिखरे, मार्केट कमिटीचे मा.चेअरमन अनिल खलाटे,सोमेश्वर चे मा.संचालक नानासाहेब खलाटे,सचिन खलाटे,तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,नाना भोसले तसेच प्रत्येक गावचे सरपंच,उपसरपंच, सदस्य व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.