Type Here to Get Search Results !

माध्यमिक विद्यालय करंजे-सोरटेवाडी शाळेत "शिक्षक दिन" साजरा आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कृत हरिदास सोरटे यांचा सत्कार

माध्यमिक विद्यालय करंजे-सोरटेवाडी शाळेत "शिक्षक दिन" साजरा 

आदर्श शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कृत हरिदास सोरटे यांचा सत्कार
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील माध्यमिक विद्यालय सोरटेवाडी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षकांविषयी व त्यांचे जीवनातील महत्त्व असणारे आपल्या भाषणातून सांगितले तर शिक्षकांनीही त्यांचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले असे विविध उपक्रम माध्यमिक विद्यालय करंजे- सोरटेवाडी या शाळेत होत असतात .
    सोमवार दि.५ सप्टेंबर २०२२ रोजी शिक्षक दिनानिमित्त बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बारामती तालुक्यातील ३ मुख्याध्यापक ७ शिक्षक व २ शिक्षकेतर अशा १२ शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सन्मानपत्र,श्रीफळ, देशी वृक्षाचे रोप देऊन व फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

  शिक्षकेतर कर्मचारी म्हणून माध्यमिक विद्यालय करंजे-सोरटेवाडी येथील हरिदास सोरटे यांचाही आदर्श शिक्षकेतर कर्मचारी म्हणून प्रमाणपत्र पुष्पकद पुष्पगुच्छ देत शालपुष्पगुच्छ देत गौरवण्यात आला.त्यामुळे माध्यमिक विद्यालय करंजे-सोरटेवाडी शाळेत "शिक्षक दिन"निमित्त  पुरस्कृत शिक्षकेतर कर्मचारी हरिदास सोरटे यांचाही  सत्कार शाळेच्या वतीने मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते,कर्यांकर्माचे अध्यक्ष-उपप्राचार्य  मासाळ सर ,उपस्थित शिक्षक वर्ग आणि कर्मचारी वर्ग,सूत्रसंचालन तुषार होळकर आणि ऋतुजा होळकर यांनी केले ,विद्यार्थी मनोगत आणी शिक्षक मनोगते झाली. आभार पडवळ सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test