वसीमभाई शेख यांचा अभिष्टचिंतन सोहळा जल्लोषात संपन्न...
इंदापूर प्रतिनिधी आदित्य बोराटे
बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांचे खंदे समर्थक, सामाजिक कार्यकर्ते वसीमभाई शेख यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा (दि. 3) रोजी इंदापूर येथे जल्लोषात संपन्न झाला.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड.राहुल मखरे, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, गटनेते कैलास कदम, भाजपा शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, बीएमपी चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य काकासाहेब जाधव, पोपटनाना पवार,माऊली नाचण, आण्णा पवार, अजिंक्य जाविर यांनी शब्दसुमनांनी वसीमभाई शेख यांना शुभेच्छा दिल्या.
इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष डी.एन. (काका) जगताप, नगरसेवक पोपट शिंदे, बिएमपी तालुकाध्यक्ष बाबासो भोंग, अतुल शेटे-पाटील, बाळासाहेब सरवदे, महेश लोंढे, हनुमंत कांबळे, अॅड. किरण लोंढे, प्रवीण हरणावळ, मयूर ढावरे, महादेव व्यवहारे, शेरखान पठाण, गुडू मोमीन, संतोष कडवळे इ. मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
या प्रसंगी बोलताना वसीमभाई शेख म्हणाले की, जोपर्यंत ॲड. राहुल मखरे यांचा आपल्या खांद्यावर हात आहे, तोपर्यंत कोणालाही न घाबरता, न जुमानता समाजातील गोरगरीब जनतेला आपल्या संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे काम करत राहणार आहे. अॅड मखरे साहेब यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे परंतु, मी त्यांच्या संयमी भुमिकेचा खुप मोठा फॅन आहे. असेही ते पुढे म्हणाले.
कोरोना महामारीच्या काळात लाॅकडाऊनमध्ये वसीमभाई यांनी गोरगरिबांना अन्नधान्याचे किट वाटप असो वा रमजान च्या महिन्यात शिरखुर्मा किटचे वाटप असो अॅड. राहुल मखरे व भरतशेठ शहा यांच्या सहकार्याने सढळ हाताने मदत केली आहे.
तसेच एखाद्या गरीबाच्या मुलीचे लग्न असेल तर त्या लग्नाला हातभार लावणे असो की एखाद्या गरीब रुग्णासाठी आर्थिक मदत असो, वसीमभाई शहरातील दानशूर लोकांकडून पैशांची जमवाजमव करून गरजू लोकांना तातडीने मदत करतात. त्यामुळे वसीमभाई यांना मानणार वेगळा वर्ग निर्माण झाला आहे.
वसीमभाई यांचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी,सलोख्याचे संबंध असले तरी कुटनितीच्या राजकारणाची झळ काही अंशी त्यांना सोसावी लागली आहे. राजकीय द्वेषातून वसीमभाई यांना खोट्या गुन्ह्यात काही दिवस तुरुंगवास ही भोगावा लागला. पण खचतील ते वसीमभाई कसले?
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब चव्हाण यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी सुरज धाईंजे, संतोष क्षीरसागर, तोसिफभाई बागवान, नागेश भोसले व अहमद रजा सोशल फौंडेशन च्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.