Type Here to Get Search Results !

मोरगाव ! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोरगावच्या मयुरेश्वर ला भेट देत अभीषेक व पूजा-आरती केली.

मोरगाव ! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  मोरगावच्या मयुरेश्वर ला भेट देत अभीषेक व पूजा-आरती केली.
सोमेश्वरनगर - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव( ता. बारामती) येथे आले होते. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भेट दिल्यानंतर मयुरेश्वर मंदिरामध्ये त्यांनी अभीषेक -पूजा व श्रींची आरती केली.

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यानिमित्त आल्या होत्या. त्यांनी मोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व  जनरिक मेडिक मेडिकलला भेट दिली.यानंतर मयुरेश्वर मंदिरामध्ये आल्या यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,  आमदार राहुल कुल, कांचन कुल, अंकिता पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप आप्पा खैरे , किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  वासुदेव  काळे,  राहुल शेवाळे, जालींधर कामठे, रविंद्र साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

 मंदिरात आल्यानंतर महिलांनी त्यांचे औक्षण केले. येथील पुजारी मंडळींनी  मंत्रोपचाराचे पठण करीत अभिषेक- पूजा व श्रींची आरती केली. मयुरेश्वर मंदिराच्या पुरातनेविषयी  व येथील व्यवस्थापना संदर्भात  त्यांनी माहीती घेतली.  श्रींच्या अभीषेक पुजानंतर  चिंचवड दिवसांत ट्रस्टच्या वतीने विश्वस्त विनोद पवार यांनी निर्मला सितारामण यांचा  शाल, श्रींची प्रतिमा,  श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test