करंजे ! राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय शेतकरी बचत मेळावा संपन्न.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथे शेतकरी मेळावा राजर्षी शाहू महाराज मागासवर्गीय शेतकरी बचत मेळावा संपन्न करंजे यांच्यावतीने करंजे येथील हनुमान मंदीरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.बारामती तालुक्याचे कृषी अधिकारी श्री.मानेसाहेब,श्री.सावंतसाहेब याप्रसंगी उपस्थित होते रब्बी हंगामातील घ्यावयाच्या पिकांच्या बाबतीत त्यांनी मार्गदर्शन केले त्याप्रसंगी बोलताना कृषी अधिकारी माने साहेब म्हणाले, कोणत्याही पीकाची पंचसूत्री असते.बीजप्रक्रिया, बीजारोपण,खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन,मेहनत ही वक्तशीर व समयोचित झाली तर शेती किफायतशीर होते अन्यथा हा व्यवसाय तोट्याचा ठरतो.पारंपारिक पद्धतीने तर शेतीच्या उत्पादनात घट होते मग शेतकरी आर्थिक चक्रात सापडतो म्हणून शेतकरी वर्गाने शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करावी प्रसंगी मार्गदर्शन घ्यावे पण निराशा पदरी घेऊ नये.आमचे कृषी खाते आपल्या सेवेसाठी सदैव तयार आहे.कृषीखात्याची डीबीटीची योजना त्यांनी विस्ताराने विषद केली.या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर,आवजारे,पाईप, इलेक्ट्रीक पंप, इत्यादी अनुदावर उपलब्ध होतो.त्यासाठी कृषी खात्याच्या वेबसाईटचा वापर करा कोणालाही भेटण्याची आवश्यकता नाही.शासन आपल्या दारी या योजनेचा शेतकरी वर्गाने फायदा घ्यावा.यासाठी एकत्र येऊन बचत गट स्थापन करावेत त्यामाध्यमातून शासकीय योजना सुलभतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील .श्री.सावंतसाहेबांनी बीजप्रक्रियेबद्दल सखोल मार्गदर्शन केले.यावेळी बचतगटाच्या सदस्यांना महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे ज्वारीच्या बियाण्याचे माजी सरपंच संताजी गायकवाड माजी उपसरपंच माऊली केंजळे,ग्रा.पं.सदस्य सावंत, अतुल गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.या कार्यक्रमास भाऊ मोकाशी व मोकाशी परिवार, भैय्यासाहेब हुंबरे,माजी शिक्षण विस्ताराधिकारी शामराव जाधव,रवी गायकवाड,आपचे अध्यक्ष मुरलीनाना गायकवाड, सोमेश्वर आय टी सेंटर करंजेपूलचे सचिन साळुंखे इत्यादी मान्यवर व बहुसंख्येने करंजे पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकाश हुंबरे यांनी केले.आभार एस.एस.गायकवाड सर व्यक्त चहापानाने या स्नेहमय कार्यक्रमाची सांगता झाली.