...ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन
पुणे - सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे व हेल्पेज इंडिया, येरवडा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रनेता ते लोकनेता सेवा पंधरवडा कालावधीत विशेष मोहिमेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शिबिरात ज्येष्ठ नागरिकांना असणारे विकार अथवा इतर शारिरीक व्याधी यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार असून मोफत डोळे तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित या आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी केले आहे.