सोमेश्वरनगर-बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालयात इयत्ता अकरावी व बारावी च्या विद्यार्थिनींना 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर' मोफत पासचे वितरण शनिवार दि ३ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी व्यवस्थापन समितीचे सहसचिव सतीश लकडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र जगताप, प्रा. शिंदे ए.एस, पर्यवेक्षिका सणस मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्रशासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेतून २०६ विद्यार्थिनींना मोफत पास वाटप करण्यात आले. या कामी बारामती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी, वरिष्ठ लिपिक कोळी मॅडम, निरा आगारचे वाहतूक नियंत्रक भंडलकर, व सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी प्रा. होळकर सरांनी आभार मानले