गौरी गणपतीला आळंदीकर कुटूंबानी साकारला 'हर घर तिरंगा' प्रतिकृती आकर्ष देखावा.
सोमेश्वरनगर - बारामती गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट असल्यामुळे महिला वर्गाला कोणतेही सण उत्सव साजरे करता आले नाही परंतु यावर्षी महिलांमध्ये हा उत्साह द्विगुणीत झालेला दिसून येतो कालपासून गौरी गणपती उत्साहास शनिवार दि ३रोजी सुरुवात झाली तर आज रविवार ४ असणारे महालक्ष्मी हळदीकुंकू निमित्त एकमेकांना व्हाट्सअप द्वारे घरी येण्याचे निमंत्रण देत घरी जात असतात. तसेच बारामतीतील करंजेपुल येथील संगीत व सुन ऐश्वर्या आळंदीकर या कुटुंबांनी सुद्धा गौरी गणपती निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जगभरात साजरा होत आहे.. त्या निमित्त हर घर तिरंगा.... पुन्हा एक प्रतिकृती संदेशरुपी गौरी गणपतीचे आकर्षक सजावट केलेली आहे .. तसेच विविध राज्यातील सकृतीदर्शन देखावे ही काही प्रमाणात केलेले आहेत.
प्रसिद्ध उद्योजक किरण आळंदीकर कुटुंब हे अशाच पद्धतीने दरवर्षी विविध सामाजिक संदेश देण्याचे गौरी गणपतीला प्रतिकृती आकर्षक देखावे करत असतात तर विविध सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर असतात त्यामुळे त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.