Type Here to Get Search Results !

जेजुरी ! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन

जेजुरी ! केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन
जेजुरी - पुरंदर तालुक्यातील महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाचे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दर्शन घेतले. अर्थमंत्री सीतारामन काल पासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असून आज सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे जेजुरी गडावर आगमन झाले.
 
खंडोबाचे दर्शन घेऊन त्यांनी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी ही उरकले. गडकोटातील बालदारीत झालेल्या समारंभात त्यांचे मार्तंड देवसंस्थान, पुजारी वर्गाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पुजारी वर्गाकडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

  यावेळी त्यांच्या सोबत माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील , अंकिता पाटील, दौंडचे आमदर राहुल कुल, कांचन कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, संगीताराजे जाधवराव निंबाळकर, आमदार बाळा भेगडे, आ. मा मिसाळ, त्याचबरोबर स्थानिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test