Type Here to Get Search Results !

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा प्रा संतोष थोरात व प्रा सचिन दुर्गाडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर.

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा प्रा संतोष थोरात व प्रा सचिन दुर्गाडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर.
पुरंदर प्रतिनिधी-पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार  नुकताच आनंद विद्यानिकेतन हायस्कूलचे विद्यार्थी प्रिय इंग्रजीचे अध्यापक संतोष थोरात तसेच एस एम जोशी हिंदी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक माननीय सचिन दुर्गाडे  यांना जाहीर झाला आहे. संतोष थोरात यांनी पाच विषयात एम.ए तसेच एम.एड.एम.फिल केलेले असून शालेय व्यवस्थापन DSM,तसेच पत्रकारिता DMCJ या विषयांमध्ये पदविका मिळवलेली आहे. त्यांनी  Total English Grammar and Composition,English Grammar for all competitive Exam व Poetry and Figures of speech या इंग्रजीच्या तीन पुस्तकांचे लेखन केले आहे त्यापैकी दोन पुस्तके प्रकाशित झालेली असून तिसरे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. तसेच सध्या ते पुणे विद्यापीठामध्ये पीएच. डी. संशोधनाचे  कार्य करत आहेत. आजपर्यंत त्यांना अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित केले असून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय गुणवत्तावाढीसाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. सध्या ते पुणे शहर टीडीएफचे सचिव म्हणून कार्यरत आहेत.
  प्रा. सचिन दुर्गाडे हे पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष व आंतरभारती पुणे चे उपाध्यक्ष असुन अनेक सामाजिक संस्थांशी जोडलेले आहेत. या संस्थांच्या माध्यमातून युवा व्यक्तित्व शिबीर, पर्यावरणीय जनजागृती व बालसंस्कार शिबिरांच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ते राबवत असतात सध्या एस. एम. जोशी हिंदी माध्यमिक विद्यालय मध्ये ते 18 वर्षापासून अध्यापन कार्य करत आहेत नुकताच त्यांना महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा विद्यालयाच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य प्र. द. पुराणिक  गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
  दोन्ही मान्यवरांची या जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल शहर जिल्ह्यातून दोघांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.   
      सदर पुरस्कार वितरण माननीय शिक्षण आयुक्त सुरज मांढरे साहेब, शिक्षण संचालक मा. महेश पालकर साहेब , माननीय सूनंदा वाखरे मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक पुणे जिल्हा परिषद यांच्या हस्ते व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या  प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक.24 2022 रोजी सकाळी 10 ते 2.30 यादरम्यान पुणे मनपाचे अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती पुणे 9 येथे संपन्न होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test