सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी सोमेश्वरनगर येथील एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूलमध्ये (CBSE) हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा १४ सप्टेंबर म्हणजेच हिंदी राष्ट्रभाषा दिनाचे औचित्य साधून सह्याद्री पब्लिक स्कूल मध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .आपल्या भारतात विविधतेत एकता कशी आहे हे नाटकाच्या रूपातून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले .इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे महत्त्व पटवून देणारे एक विनोदात्मक नाटक सादर केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी हिंदीच्या कवितांचे गायन सादर केले. विद्यार्थ्यांमध्ये चौकस वृत्ती वाढीस लागावी या हेतूने वेगवेगळ्या हिंदीतील पहेलीचेही प्रश्नही विचारण्यात आले. हिंदी भाषेची विविधता दाखवण्यासाठी इयत्ता आठवीच्या मुलींनी एक सुंदर नृत्यही केले होते. सतीश कांबळे सर व दिपाली गायकवाड यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना जीवनात हिंदी भाषा व त्याचबरोबर इतर भाषांचेही महत्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे नियोजन हिंदी विषय शिक्षक वैशाली गायकवाड, मनीषा सरोदे ,दिपाली गायकवाड ,स्वाती फरांदे ,यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील वेदांती चाबुकस्वार व अनन्या अहिवळे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्री अजिंक्य सावंत, सह्याद्री पब्लिक स्कूलचे प्राचार्य अजित वाघमारे उपप्राचार्य अनुराधा खताळ व किशोरी काकडे मॅडम तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.