विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा.
फोटो ओळ - कळंब ता इंदापूर येथे स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव कार्यक्रम प्रसंगी मान्यवर.....
कळंब ता इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. चालू शैक्षणिक वर्षात वाणिज्य विद्या शाखेत प्रवेश घेतलेल्या नूतन विद्यार्थ्यांचे वेलकम व तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ यावेळी संपन्न झाला. महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी किरण मगर यांची मुंबा प्रो कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान उपाध्यक्ष प्रकाश कदम व सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते किरण मगर यांचा सन्मान करण्यात आला.विद्यापीठ क्रीडा विभागाचे चालू वर्षी यजमानपद महाविद्यालयास प्राप्त झाल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंकुशराव आहेर व शारीरिक शिक्षण संचालक डॉ सुहास भैरट यांचा सन्मान संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्राचार्य डॉ.अंकुश आहेर यांनी देशाच्या ७५ वर्ष अमृत महोत्सव याची महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.देशाला ज्या क्रांतिवीरांनी सुधारकांनी आपल्या जीवाची बाजी लावून स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान दिले त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करून त्यांचे विचार समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले.देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली या निमित्त सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्ञानेश्वर गुळीग ,प्रा विद्या गुळीग यांनी सांस्कृतिक विभागामार्फत विविध कला गुण दर्शनाचा ७५ मिनिटांचा विविध कलागुणदर्शन कार्यक्रम सादर करण्यात आला.देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य व गायन सादरीकरण केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.अरुण कांबळे, क्रीडा संचालक डॉ. सुहास भैरट ,विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा राजेंद्र कुमार डांगे ,डॉ विलास बुवा, प्राध्यापक प्रशांत शिंदे, कला शाखा विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. रामचंद्र पाखरे ,प्राध्यापक जोत्सना गायकवाड , डॉ विजय केसकर,प्रा रविराज शिंदे, प्रा. विनायक शिंदे , डॉ .प्रा. तेजश्री हुंबे, ग्रामपंचायत सदस्य संदिप पाटील इ मान्यवर प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कपिल कांबळे यांनी व आभार प्रदर्शन प्रा.ज्ञानेश्वर गुळीग यांनी व्यक्त केले.