पाऊस ! राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा...
३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात
सर्वत्रच मोठ्या विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा राज्यात सक्रिय झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील श्रावण महिन्या सुरू होताच श्रावण सरी कोसळू लागल्या आहेत. मुंबईच्या हवामान विभागाने आता राज्यातील ६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला त्यामध्ये ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि रायगडमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर यासोबतच जोरदार वारेही काही ठिकाणी वाहतील. मुंबईच्या हवामान विभागाकडून हा इशारा दिला.
नाशिक, सोलापूरसह उस्मानाबाद, ठाणे, पालघर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. यासोबतच वेगवान वारेही वाहतील. जवळपास ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.