आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भ्रष्टाचाराची चौकाशी करा.
आयएसीचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांची मागणी
बारामती - विधानपरिषदेचे सदस्य होताच गोपीचंद पडळकरांनी कोट्यावधीची गाडी घेतली असुन ही गाडी खरेदी करण्यासाठीची रक्कम त्यांनी भ्रष्टाचारातून उभारल्याचा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी रविवारी बारामती या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला. पडळकर यांनी त्यांच्या
विधानपरिषदेच्या फंडातून कोट्यावधीचा भ्रष्टाचार आरोप देखील त्यांनी केला आहे. सांगली, कोल्हापूर तसेच विविध ठिकाणी रस्ते इतर बांधकामातून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा दावा देखील पाटील यांनी केला आहे. यासंबंधी सर्व पुरावे शासन दरबारी सादर करणार असल्याचे हेमंत पाटील
यांनी म्हटले आहे. लोक प्रतिनिधीतून करण्यात येणाऱ्या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी तसेच पडळकर यांच्यासोबत सामील दोषीवर कठोर कारवाई करावी. देशाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार व त्यांच्या कुटुंबावर खालच्या स्तरावर आरोप करून पडळकरांनी त्यांची पायरी ओळखावी असाही सल्ला हेमंत पाटील यांनी दिला आहे. पडळकरांचे राजकीय भविष्य अंधातरी असल्याने त्यांच्या डोक्यात केमिकल लोचा झाला आहे. त्यांनी मानसोपचारतज्ञांकडून उपचार करून घ्यावेत असा सल्ला देखील हेमंत पाटील यांनी दिला आहे.
सदरील पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या स्तरावर जावून टिका टिपण्णी केल्यास त्यांना राजकीय नाहीत तर सामाजीक महत्व देखील राहणार नाही. असा सुचक इशारा पाटील यांनी दिला.