...येथे विमानांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन आयोजन.
पुणे - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे - बालेवाडी येथे दिनांक १२ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत विमानांच्या विभिन्न प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रवासी विमाने, मिग २९, फायटर विमाने, इ. विमानांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये प्रदर्शित करण्यात येईल. तसेच पुण्याचे हवाई दर्शन दाखविणारा माहितीपटदेखील दाखविला जाणार आहे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी सकाळी १० ते ६ या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.