करंजेपुल येथे महिलांनी मोठ्या उत्साहात नागपंचमी सण केला साजरा.
तीन वर्षांनी सण साजरा केल्याने छोट्या मुलीसह महिलांमध्ये मोठा उत्साह.
सोमेश्वरनगर: श्रावण महिन्यातील पहिला सण नागपंचमी मंगळवारी दि २ रोजी साजरा करण्यात आला. शहरी भागासह ग्रामीण भागात मोठ्या आनंदात हा सण महिलावर्ग हा सण साजरा करत असतात. बारामती तालुक्यातील करंजेपुल येथे
दगडी नागाच्या मूर्तीला महिलांनी दूध अर्पण केले. करंजेपूल तसेच सोमेश्वर पंचक्रोशीतील महिला मोठ्या संख्येने एकत्र येत
महिलांनी पारंपरिक पद्धतीने नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला. एकत्रित तीन वर्षांनी हा सण साजरा करता आल्याने सर्व महिला ,लहान चिमुरड्या तसेच युवतीनि आनंदाने व मोठ्या उत्साहात पंचमीनिमित्त पारंपरिक विविध संगीतावर नाचत व पारंपारिक पद्धतीने फेर धरण्यात आला तसेच देशावर आलेले कोरोणाचे संकट पुन्हा कधी येऊ नये असेही भाऊ स्वरूपात मानत असलेल्या नागदेवताला पूजा केली असल्याचे बोलताना संगितले . आम्ही करंजेपुल व पंचक्रोशीत महिला एकत्र येत वर्षातून येणारे सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे करत असतो.