सोमेश्वरनगर ! मु.सा.काकडे महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु.सा.काकडे महाविद्यालयात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद त्यांचा जन्मदिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.रुपेश थोपटे, संस्थेचे सह-सचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समितीच्या सदस्या सुजाता काकडे, उपप्राचार्य डॉ.जगन्नाथ साळवे, प्रा. अच्युत शिंदे, आयक्यूएसी समन्वयक डॉ.संजू जाधव डॉ.श्रीकांत घाडगे, जगताप.आर.एस उपस्थित होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयात सुरू असणाऱ्या विविध क्रीडा उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन विविध स्पर्धांच्या माध्यमातून महाविद्यालयाचे आणि परिसराचे नाव उज्वल करावे असे आव्हान केले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.रुपेश थोपटे यांनी वेगवेगळ्या योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शरीरातील विविध आजारांवर मात करता येते व दैनंदिन जीवनातील योगाचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.बाळासाहेब मरगजे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रा. दत्तराज जगताप यांनी मानले.