Type Here to Get Search Results !

पुणे ! 'कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था' वतीने १५ ऑगस्ट ७५ वा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.."विशेष गुणवंत विद्यार्थी" गुणगौरव;कौटुंबिक मेळावा व मान्यवर पुरस्कार वितरण संपन्न.

पुणे ! 'कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था' वतीने १५ ऑगस्ट ७५ वा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..

"विशेष गुणवंत विद्यार्थी" गुणगौरव;कौटुंबिक मेळावा व मान्यवर पुरस्कार वितरण संपन्न.
पुणे प्रतिनिधी ,कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे समाजाच्या वतीने १५ ऑगस्ट 2022 च्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षी धुमधडाक्यात साजराकेला "विशेष गुणवंत विद्यार्थी" गुणगौरव सभारंभा सोबत कौटुंबिक मेळावा व मान्यवर पुरस्कार वितरण  महासोहळा....
   कोकणस्थ कुंभार समाज विकास संस्था पुणे यांनी 15 ऑगस्ट 2022 रोजी पुणे कुंभार समाजाचा महासोहळा 2022 चे ऑफलाईन व ऑनलाईन फेसबुक च्या माध्यमातून दिमाखात आयोजन केले. संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष कोकणरत्न श्री चंद्रकांतजी चिवेलकर ( साळवी) यांच्या प्रेरणेने समस्त समाज बांधव  मोठ्या संख्येने एकत्रित जमले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री विश्वजित अशोक शिरकर  तर कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती महापौर आदरणीय श्री. मुरलीधर मोहोळ , मा. नगरसेवक रघुनाथजी गौडा ,मा. नगरसेवक अशोकभाऊ हरणावळ व आदी मान्यवरांनी भूषविले. दुपारी ४.०० वाजता सूरू झालेला  हा दीमाखदार सोहळा सायंकाळी ९.०० वाजेपर्यंत धुमधड्याकात साजरा झाला या मधे अनेक मनोरंजन पर कार्यक्रम झाले या मध्ये जय हनुमान नवतरुण मंडळ कोळकेवाडी (कुंभारवाडी) चिपळूण यांचे सोबत शिवशाहीर गुरुराज कुंभार यांच्या गायकीतून कोकणातील आकर्षण असणारे जाकडी नृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढविली  त्या नंतर परीक्षेत विशेष गुण संपादीत केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्या मधे  इयत्ता १० वी , ९७.२० % गुण मिळविलेल्या कु. राशी कडमडकर व  इयत्ता १२ वी मधे ९५.६७ % गुण मिळविलेल्या कु. रिशीका कुंभार व कु. शुभम साळवी यांचे  पुरस्कार प्रदान करून त्यांचे कौतुक केले गेले त्याच बरोबर समाजासाठी मनापासून झटणाऱ्या व आपल्यातील कलागुणांची जनमाणसात विशेष छाप सोडणाऱ्या मान्यवरांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या मध्ये श्री गजाननदादा बागावडे यांना "समाज रत्न" पुरस्काराने  सन्माननीय  श्री दिपकजी  निवळकर ( कात्रोळी ) चिपळूण यांना "समाजभूषण" पुरस्काराने तर "कुंभार कलागौरव" पुरस्कारा साठी कुंभार सुप्रसिद्ध गायिका सौ सुरेखाताई सूरेश साळवी व श्री प्रकाशजी गणपत साळवी ,जालगाव ( दापोली ) यांचा यथोचित पुरस्काराने गौरविण्यात आले त्याच बरोबर अनेक आदरणीय मान्यवरांना यशस्वी उद्योजक पुरस्कार , समाजगौरव पुरस्कार ,  गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगना पुरस्कार इत्यादींचे सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरवविण्यात आले समस्त समाज बांधवांचे व निमंत्रितांचे स्वागत समाजाचे संघटक श्री संतोष साळवी (चिवेलकर) यांनी केले तर प्रस्तावना वाचन ची जबाबदारी महीला संघटक सौ वैशालीताई मंडळ ( अंबीरकर ) यांनी पारपाडली सूत्रसंचालनाची जबाबदारी सौ. जोस्तनाताई सागर साळवी , कु. प्रगती साळवी, कु. स्वरदा साळवी , कु. दिव्यांश कळमकर यांनी स्वीकारली या  कार्यक्रमात गावच्या अभंगापासून  देशभक्तीपर गीत, नृत्य, भक्तीगीत, कोकणी नृत्य, पोवाडा,चित्रपटगीत अशा विविधांगी मेजवानीने  रंगतदार झाला
या  सोहोळ्याचा आस्वाद समस्त महाराष्ट्रातील अखिल कुंभार बांधवांना घेता यावा यासाठी  फेसबुक ( kokanast kumbhar samaj pune )  च्या माध्यमातून ' LIVE ' सदारीकरण पाहण्याची सुविधा  उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी समाजाचे आदरणीय मान्यवर श्री अशोकजी शिरकर व श्री गजाननदादा बागावडे,श्री सूर्यकांतजी चिवेलकर ( साळवी ), श्री संतोषभाऊ कळमकर, कु. धनंजय बागावडे,  सौ. छाया साळवी ,  श्री संदीप मटकर (साळवी), श्री सागर विन्हेरकर , श्री सुनील चिवेलकर , श्री साईचंद्र करंजेकर,श्री तुकारामजी शिरकर ,श्री मदन व्हालकर ,श्री विशाल पालशेतकर श्री. मनोज साळवी, सौ. प्रिया लांजेकर, श्री प्रदीप लांजेकर यांनी विशेष मेहेनत घेतली. यांच्या मुळेच सर्वांना घर बसल्या सोहोळ्याचा मनमोकळा आनंद अनुभवता आला आहे 
या कुंभार महासोहोळ्यामध्ये पुणे शहरातील  कुंभार समाजाच्या कोहिनुर हिऱ्यांचा प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रातील कुंभार बांधवांच्या घरा घरात पोहोचला आहे. आणि हा सोहोळा  प्रकाशमान सोहोळा ' झाला आहे आणि सर्वांच्या मनातला अंधकार दूर करून सर्वांच्याच जीवनाला सकारात्मक ऊर्जा व दीशा देणारा ठरला अशी माहिती संघटक - संतोष चंद्रकांत साळवी -चिवेलकर यांनी दिली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test