अल्पसंख्यांक समुहातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचत गट योजना
योजनेचा उद्देश...
■अल्पसंख्यांक समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सक्षम बनविणे.
■अल्पसंख्यांक समाजातील महिलांच्या स्थायी विकासासाठी स्वयंसहाय्य बचतगट बांधणी करून स्वमदतीसाठी महिलांना बळकट करणे.
*योजनेची अंमलबजावणी*
■ महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राज्यातील मुंबई, नांदेड, मालेगाव, कारंजा, परभणी, पुणे, नागपूर, औरंगाबाद, भिवंडी, मुंब्रा-कौसा व मिरज या शहरांमध्ये राबविण्यात येते.
■ या योजनेसाठी शासनामार्फत महिला आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्यात येतो.
*योजनेसाठी आवश्यक*
■बचतगट प्रमुखाचा थोडक्यात परिचय
■बचत गटाच्या मागील दोन ते तीन वर्षांच्या आर्थिक व्यवहाराचा जमाखर्चाचा तपशील.
■विविध शासकीय विभागाकडून बचत गटास मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती.
■बचत गटातील कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सभासदांच्या जातीचे, उत्पन्नाचे दाखले प्राधिकृत सक्षम अधिकाऱ्यांची स्वाक्षरी.
■ बचत गटातील सभासदांचे रंगीत छायाचित्र.
■ दारिद्र्यरेषेखालील उमेदवारांनी दारिद्र्यरेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
संपर्क:महिला आर्थिक विकास महामंडळ, ४७, अशोक बलकवडे मार्ग, नवी पेठ, सदाशिव पेठ, पुणे