बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे वाढदिवसानिमित्त स्केटिंग स्पर्धा संपन्न
बारामती :विद्या प्रतिष्ठान न्यू बाल विकास इंग्लिश मिडीयम स्कूल पिंपळीचे स्केटिंग प्रशिक्षक उमर पठाण यांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या ६३ व्या वाढदिवसानिमित्त स्केटिंग स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत बारामतीतील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. विद्या प्रतिष्ठान न्यू बालविकास, विनोद कुमार बाल विकास, डॉ.सायरस पूना वाला, न्यू इंग्लिश मिडियम स्कूल सीबीएसई, इंग्लिश मिडियम स्कूल, पोतदार इंटरनॅशनल इत्यादी स्कूल व शाळातील १५० स्केटर्सनी या स्पर्धा कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत इनलाइन श्रेणी ९ ते ११ वर्षे सुवर्णपदक विजेते नीरज करे, अन्विता कामूर्ती, ११ ते १३ वर्षे संयोगिता सातव, प्रतीक गर्जे, तनिश माळवे व १५ वर्षांवरील मुली आणि मुले सिया गांधी, श्लोक दोशी यांनी सुवर्णपदक पटकावले. बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
स्केटिंग प्रशिक्षक उमर पठाण हे अजित पवार यांचे चाहते असून ते प्रत्येक वर्षी न चुकविता अजित पवार यांचे वाढदिवसानिमित्त स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करून त्यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असतात.
या स्पर्धेत स्केटर्सनी सुवर्ण,रौप्य आणि कांस्य पदके मिळवली.
आयोजनाबद्दल बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी विशेष कौतुक केले तसेच स्केटर्स आणि पालक यांनी स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करून विध्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त करून अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, बारामती तालुका सोशल मीडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,प्रमुख पदाधिकारी,स्केटर्स आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.