बापरे ..... रस्त्यावरील पुल एवढा खचला की... एसटी बंद ...नागरिकांसह विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसा.
हिंगणघाट तालुक्यात १८ जुलैला व त्यांनतर झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कित्येक पुल वाहुन गेले तर काही रसत्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.याच पाऊसात तालुक्यातील आजनसरा टाकळी रस्त्यावरील पुल अतिवृष्टीमुळे खचल्याने एसटी बस बंद झाली असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.तरी तातडीने पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी आज २० ऑगस्टला विद्यार्थी व गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.टाकळी येथिल विद्यार्थी मोठ्या संख्येने एसटी बसने वडनेर येथे शिक्षणासाठी येत आहे.मात्र आता या मार्गावरील पुल वाहुन गेल्याने एसटी बस बंद झाली आहे.यामुळे विद्यार्थ्यांना वडनेर येथे शाळेत येण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरी जावे लागते आहे.तरी संबंधी विभागाने या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून तातडीने पुलाची दुरुस्ती करुन बस सेवा सुरु करावी अशी मागणी विद्यार्थी व गावातील नागरिकांनी केली.