कोरोना काळात पिंपळी गावची सेवा केल्याबद्दल व पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी पदी बढती मिळाल्याबद्दल अन्सार सय्यद यांचा सन्मान
बारामती:पिंपळी गावचे मा.ग्रामविकास अधिकारी अन्सार सय्यद यांनी कोरोना काळामध्ये ग्रामपंचायत सदस्य कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक पदी नेमणूक झाल्यानंतर संचालक संतोषराव ढवाण पाटील,मा.सरपंच रमेशराव देवकाते पाटील यांच्या यांच्यासोबत गावामध्ये सॅनिटायझर फवारणी करून व प्रतिबंधक उपाययोजना करून गावकऱ्यांना कोरोना संक्रमना पासून मुक्त करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
त्याबद्दल पिंपळी-लिमटेक गावातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन व बारामती पंचायत समिती याठिकाणी कृषी विस्तार अधिकारी पदी बढती मिळाल्याबद्दल पिंपळी ग्रामपंचायतीच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी त्यांचा शाल व वृक्षरोप भेट देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच पिंपळी गावातून पायलट प्रशिक्षणसाठी ऋतुंबरा रमेश देवकाते पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य यांच्या हस्ते गावच्या वतीने करण्यात आला.
यावेळी छत्रपती कारखान्याचे संचालक संतोषराव ढवाण पाटील, सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील,बारामती खरेदी-विक्री संघाचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब भिसे, बारामती खरेदी विक्री संघांचे संचालक नितीन देवकाते,
बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, पोलीस पाटील मोहन बनकर,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,ग्रामपंचायत सदस्य अजित थोरात, राहुल बनकर, वैभव पवार, सदस्या स्वाती ढवाण, अश्विनी बनसोडे, कोमल टेंबरे,मीनाक्षी देवकाते, मंगल खिलारे, सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्षा स्नेहा थोरात तसेच ग्रामस्थ हरिभाऊ केसकर, अशोक देवकाते, सोना देवकाते, देवेंद्र बनकर, रमेश देवकाते, रमेश देवकाते,कर्मचारी प्रसन्ना थोरात,अनिल बनकर,सोपान थोरात, महादेव खोमणे, सतीश शिंदे त्याचप्रमाणे शिक्षक,आरोग्य अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.