Type Here to Get Search Results !

बारामती ! पिंपळीत महिला बचत गटास बँकांचे अर्थ साक्षरता मार्गदर्शन

बारामती ! पिंपळीत महिला बचत गटास बँकांचे अर्थ साक्षरता मार्गदर्शन 
बारामती : बारामती तालुक्यातील पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील महिला बचत गटातील महिलांसाठी बँकेची कर्ज व अनुदान योजनाचा लाभ मिळावा याकरिता मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक संतोषराव ढवाण पाटील,सरपंच मंगल केसकर,उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील,ग्रामपंचायत सदस्य अश्विनी बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ केसकर यांनी यांनी बँकेचे अधिकारी व पंचायत समिती बचत गट समन्वयक शुभांगी सूर्यवंशी यांचा पुष्परोप भेट देऊन सत्कार व स्वागत केले.
      या मेळाव्यास भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळी चे व्यवस्थापक निखिल पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळोची शाखेचे व्यवस्थापक पांडुरंग जगताप व बारामती आय.सी.आय.सी बँकेच्या एस.एच.बी.विभागाच्या अधिकारी प्रणाली जाधव आदींनी ते कार्यरत असलेल्या बँकेमार्फत बचत गटासाठी उपलब्ध असलेल्या कर्ज योजना व व्याज सवलतीची माहिती दिली. तसेच बँकेत ज्या बचत गटाचे  खाते नियमितपणे चालू आहे व ज्या गटांना सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अशा बचत गटांना कर्ज देऊ तसेच नवीन बचत गटांचे खाते शंभर ते दोनशे रुपयांमध्ये किंवा झिरो बॅलन्स खाते काढून देण्यात येईल व त्यांचेही व्यवहार नियमित झाल्यानंतर कर्ज पुरवठा करण्यात येईल असे मार्गदर्शन तिन्ही बँकेच्या अधिकाऱ्यांनी केले.
          बचत गटातील महिलांना ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी अर्थ साक्षरता विषयी माहिती दिली व राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज घ्यावे तसेच शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
 आभार भाषणात उपसरपंच आबासाहेब देवकाते यांनी फायनान्स कंपनी किंवा खाजगी बँकांच्या प्रतिनिधीच्या भूलथापाना बळी न पडता राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घ्यावे असे मार्गदर्शन केले.
   पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे मार्फत बचत गटांसाठी राबविल्या जाणाऱ्या कर्ज व अनुदान योजना तसेच सामूहिक उद्योग व वैयक्तिक उद्योग,व्यवसाय करण्यासाठी बँक व पंचायत समिती मार्फत राबवले जात असलेल्या योजनांची माहिती तसेच बचतगटातील महिलांनी रजिस्टर अद्यावत ठेवावे, बचत गट अध्यक्ष व सचिव यांनी दर महिन्याला एक मासिक मिटिंग घेऊन वेळेत बचत बँकेत जमा करावी, खात्याचा व्यवहार एक संघपणे चालवावा त्याचा फायदा बँकेतून कर्ज मिळण्यासाठी होतो. तसेच बचत गटातील अडीअडचणी सोडविल्या जातील असे मार्गदर्शन बारामती पंचायत समितीच्या बचत गट समन्वयक शुभांगी सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी पिंपळी ग्रामपंचायतीच्या वतीने बचत गटातील महिलांना मोफत राष्ट्रध्वज झेंड्यांचे वाटप करण्यात आले. 
      यावेळी छत्रपती कारखाना संचालक संतोषराव ढवाण पाटील,सरपंच मंगल केसकर, उपसरपंच आबासाहेब देवकाते, बारामती तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे,ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,पिंपळी गाव बचत गट सी.आर.पी.व ग्रा.पं.सदस्या अश्विनी बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ केसकर,ग्रामपंचायत सहाय्यक लिपिक अनिल बनकर, शिपाई बाळासो बनसोडे, महिला बचत गटातील अध्यक्ष व सचिव दिपाली राजगुरू,स्वाती ठेंगल,सविता कोकरे, वैशाली गायकवाड,मानिनी थोरात,उर्मिला वाघ,मनिषा गायकवाड,सना इनामदार,शिला वाघ,जयश्री शिंदे,उज्वला यादव,स्वाती शिंदे,सारिका थोरात,अरुणा वाघ,शायनाबी इनामदार,अपर्णा वाघ,अंगणवाडी सेविका सोनम केसकर, रेशमा रुपनवर व बचत गटातील आणि ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

test