पुणे ! सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू
पुणे, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून शासकीय सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांचकडील कर्मचाऱ्यांची १ जुलै २०२२ दिनांकास अनुसरून सेवा विषयक व वेतन विषयक माहिती https://mahasdb.mahaonline.gov.in/CGE या संकेतस्थळावर ऑनलाईन अद्ययावत करावी. याकरीता जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी संगणकीय आज्ञावलीचे युजरनेम व पासवर्ड जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पुणे यांचेकडून उपलब्ध करून घ्यावेत.
माहिती अद्ययावत करून त्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र जिल्हा सांख्यिकी कार्यालय, २५ शुक्रवार पेठ, महात्मा फुले मंडईसमोर, स्वामी समर्थ मठाशेजारी, पुणे-२ (दू.क्र. ०२०-२४४५३२३६, ई-मेल: (des.dsopune@gmail.com, dso.pune@hotmail.com) या कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावे. सदरचे प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर २०२२ देय डिसेंबर २०२२ वेतन देयकासोबत व माहिती बरोबर असल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी २०२३ देय मार्च २०२३ च्या वेतन देयकासोबत जोडावे. प्रमाणपत्र न जोडलेल्या कार्यालयांची वेतन देयके कोषागार कार्यालयाकडून पारित करण्यात येणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत शासकीय कर्मचाऱ्यांचा माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्र. उपसंचालक नि.चं. जोशी यांनी केले आहे.