भावा, नोकरीत मन रमत नाही…! मग.... या विदेशी शेळींचे पालन करा, नोकरीपेक्षा लय भारी
...अन कमई भी लय भारी.
देशात शेतकऱ्यांसह युवा पीडी गेल्या अनेक शतकांपासून मोठ्या प्रमाणात शेळी पालन (Goat Rearing) केले जात आहे. विशेष म्हणजे शेळी पालन शेतकरी बांधवांसाठी (Farmer) फायद्याचे ठरत आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत शेळीपालन करता येत असल्याने अनेक अल्पभूधारक शेतकरी आता शेळीपालन (Goat Farming) व्यवसायाला नोकरीपेक्षा ज्यास्त पसंती दर्शविली आहे.
मुरब्बी तसेच जाणकार नागरिक देखील शेतकरी बांधवांना शेती (Farming) समवेतच शेतीपूरक व्यवसाय (Agri Business) म्हणून शेळी पालन करण्याचा सल्ला देत असतात. शेळीपालन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा आता जणू काही कणाच बनला आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी शेळीच्या विदेशी जातींची (Goat Breed) माहिती घेऊन हजर झालो आहोत.
जाणकार लोक सांगतात की शेळींच्या सुधारित जातींचे पालन केल्यास शेळी पालन करणाऱ्या शेतकरी बांधवांना अधिक नफा (Farmer Income) मिळू शकतो. मित्रांनो इथे आम्ही नमूद करू इच्छितो की, कोणत्याही शेतकरी बांधवांनी विदेशी किंवा देशी कोणत्याही जातीच्या शेळीचे पालन सुरु करण्याअगोदर एकदा तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक राहणार आहे. येथे दिलेली माहिती ही अंतिम नसून यासाठी तज्ञ लोकांचा सल्ला अपरिहार्य राहणार आहे.
परदेशी शेळ्यांच्या प्रमुख जाती
अल्पाइन...
अल्पाइन ही एक विदेशी शेळीची जात आहे. ही जात स्वित्झर्लंडची असल्याचे सांगितले जाते. ही जात प्रामुख्याने दूध उत्पादनासाठी पाळली जाते आणि जाणकार देखील या जातीच्या दूध उत्पादनक्षमता याची ग्वाही घेतात. या जातीच्या शेळ्या आपल्या गृह क्षेत्रात म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये दररोज सरासरी 3-4 किलो दूध देतात.
■ अँग्लोन्यूव्हियन ...
ही देखील एक शेळेची सुधारित जात असून एक विदेशी जात आहे. शेळीची ही जात युरोपच्या वेगवेगळ्या देशांमध्ये आढळते. ही जात मांस आणि दूध दोन्हीसाठी योग्य असल्याचे जाणकार स्पष्ट करतात. या जातीची दूध उत्पादन क्षमता 2-3 किलो प्रतिदिन असल्याचा दावा केला जातो.
■ सॅनन ...
ही देखील एक शेळीची सुधारित जात आहे. ही स्वित्झर्लंडची बकरी आहे. त्याची दूध उत्पादन क्षमता इतर सर्व जातींपेक्षा जास्त आहे. ते आपल्या घरच्या भागात दररोज सरासरी 3-4 किलो दूध देते.
■ टोगेनबर्ग...
टोगेनबर्ग ही सुद्धा स्वित्झर्लंडची शेळी आहे. याच्या नर व मादीला शिंगे नसतात. ते दररोज सरासरी 3 किलो दूध देते.