दिव्यांग व इतर सर्वसाधारण उमेदवारांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन
पुणे :-कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने आणि समर्थन ट्रस्ट फॉर डिसेबल, पुणे लाईव्हलीहूड रिसोर्स सेंटर या सामाजिक संस्थेमार्फत शनिवार २७ ऑगस्ट २०२२ रोजी कन्यादान मंगल कार्यालय मोंजिनिस केकशॉपच्या मागे,भाजी मार्केट चौक हडपसर पुणे येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व रिक्तपदे दिव्यांग व इतर सर्वसाधारण उमेदवारांमधून भरली जाणार असून, ज्या उमेदवारांचे शिक्षण दहावी, बारावी, पदवी, आयटीआय, डिप्लोमा व इतर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या दिव्यांग व इतर सर्वसाधारण उमेदवारांना या मेळाव्याद्वारे नोकरीची संधी मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांनी याचा उपयोग करुन घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त कविता ह. जावळे यांनी केले आहे.
पात्रता धारण करणाऱ्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScEHu1xq9wiLx6Ub9tf1TXm4phjsAJ3HGc39UG3G_ioRaHS9Q/viewform?usp=pp_url
या लिंकद्वारे आपली नोंदणी करावी. आपले आधार कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र (फक्त दिव्यांग उमेदवारांसाठी), शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे ४फोटो आणि आपला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह शनिवार २७ ऑगस्ट २०२२ रोजी मेळाव्याच्या ठिकाणी समक्ष उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन सहायक आयुक्त श्रीमती जावळे यांनी केले आहे.