बारामती ! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त म.ए.सो च्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात रंगली चित्रकला स्पर्धा.......
बारामती - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त म.ए.सो च्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात रंगली चित्रकला स्पर्धा बुधवार,दि.१० ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त म.ए.सो च्या हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूल, निर्मलाबाई हरिभाऊ देशपांडे मुलींचा विभाग तसेच कै.गजाननराव भिवराव देशपांडे मुलांच्या विभागातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी 'हर घर तिरंगा' ची घोषणा देत प्रभात फेरी काढली.
अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बारामती मधील म.ए.सो च्या सर्व प्रशालांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गटनिहाय विषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. प्राथमिक विभागाची स्पर्धा हरिभाऊ गजानन देशपांडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला बालचमूंचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी कै. गजानन भिवराव देशपांडे मराठी मिडीयम स्कूलमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
कलाप्रेमी विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण, थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रसंग, युध्दातील प्रसंग, झेंडा विकणारा मुलगा अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी अतिशय रेखीव आणि सुंदर अशी चित्रे रेखाटली.