रिमझिम पावसात भाविकांनी घेतले 'सोमेश्वर' स्वयंभू शिवलिंग दर्शन.
श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी ५० हजाराहून अधिक शिवभक्त घेतले दर्शन.
सोमेश्वरनगर - प्रसिद्ध पुणे जिल्ह्यातील सोरटी सोमनाथाचे प्रतिरूप मानले जाणारे "सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग" करंजे( ता बारामती) येथे विविध जिल्ह्यातून ५० हजाराहून अधिक शिवभक्तांनी दर्शन घेतले असल्याचे माहिती देवस्थान ट्रस्ट यांनी दिली.
श्री क्षेत्र सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग चे दर्शन घेण्यासाठी रविवार पासूनच गर्दी झाली होती.मोठमोठ्या रांगा मंदिर परिसरात पहायला मिळाल्या तसेच सोमवारी मध्यरात्री १२ वाजता ची महापूजा व अभिषेक बारामती तहसीलदार विजय पाटील व महालक्ष्मी उद्योग समूह उद्योजक नितीन सातव यांच्या शुभहस्ते संपन्न झाली तर पुरोहित मुकेश भांडवलकर व ऋषि घोलप होते. महापूजे दरम्यान देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर , सचिव राहुल भांडवलकर, खजिनदार सोमनाथ भांडवलकर सर्व विश्वस्त मंडळ तसेच राष्ट्रवादी बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर ,जेष्ठ बारामती तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष मोहन भांडवलकर ,करंजे सरपंच जया गायकवाड, करंजेपुल वैभव गायकवाड तसेच पंचक्रोशीतील जेष्ठ सन्मानित ग्रामस्थ उपस्थित होते अशी माहिती विश्वस्त संतोष भांडवलकर यांनी दिली.
श्रावणी दुसऱ्या सोमवारी "सोमेश्वर स्वयंभू शिवलिंग" सूंदर आकर्षक पुष्प सजावट साखरे उद्योग समूह दीपक साखरे यांनी केली तर महाप्रसादाचे नियोजन सिद्धार्थ गीते, होळ, यादव मॅडम जेजुरी तसेच सायंकाळचे अन्नदान दीपक जाधव यांनी केले अशी माहिती विश्वस्त राजेंद्र भांडवलकर यांनी दिली
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवार निमित्त मागरवाडी येथील सामन्य कुटूंबातील मेंढपाळ गजानन साळबा पडळकर यांनी श्रावणी शेवटच्या सोमवारी असणाऱ्या श्री सोमेश्वर श्रींच्या मूर्ती मिरवणुकीसाठी सुंदर ,सुबक पालखी अर्पण केली त्यासाठी सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष, सचिव , खजिनदार व सर्व विश्वस्त मंडळ यांनी त्यांचे मनापासून आभार मानले व पडळकर कुटुंब यांचा सत्कारही केला ही पालखी बाबुर्डी येथील रवींद्र केदारी या कारागिराने अतिशय सुबक केल्याने त्यांचाही सत्कार देवस्थान ट्रस्ट यांनी यावेळी केला
आरोग्य विभाग होळ यांच्या मार्फत भाविकांसाठी मोफत औषध े व विनामूल्य उपचार करण्यात आले. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे करंजेपुल दुरक्षेत्रे चे पोलीस निरीक्षक योगेश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व मंदिर परिसरात चोक बंदोबस्त ठेवण्यात आला.
श्रावणी दुसऱ्या सोमवारी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी झाली असल्याने पाळणे, खेळनी वाले ,गृहपेयी वस्तू ,मिठाई,हॉटेल व्यावसायिक व सर्वच चांगला व्यवसाय झाल्याने आनंदी होते तसेच पुढील पुढील येणाऱ्या तिसऱ्या सोमवारी सलग सुट्ट्या आल्याने या व्यवसायांना चांगले दिवस येणार असल्याचे व्यावसायिक सचिन गायकवाड यांनी बोलताना सांगितले.