अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त "तथास्तु आयसीयू आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल"वतीने आजी माजी सैनिक व पोलिसांचा सन्मान.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथे असणाऱ्या "तथास्तु आयसीयूआणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल " वतीने स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव जगभरात साजरा होत असताना हॉस्पिटलचे प्रमुखडॉ सतीश चव्हाण यांनी देशासाठी लढणाऱ्या सैनिक व देश सेवा करणाऱ्या पोलीस बांधवांचा गुरुवार दिनांक 18 रोजी"तथास्तु आयसीयू आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल " येथे फळझाडे देऊन सन्मानयुक्त सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख उपस्थित वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे होते तसेच आजी माजी संघ अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर हॉस्पिटल प्रमुख डॉ सतीश चव्हाण , डॉ आनंद सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी प्रमुख ए. पी. आय . लांडे बोलताना म्हणाले की प्रथमच आजी - माजी सैनिक तसेच पोलिसांचा सत्कार एक हॉस्पिटल करत आहे हे खरंच अभिमानाची गोष्टआहे तसेच त्यांनी हॉस्पिटल विषयी माहिती घेत नागरिकां
ना चांगल्या सुख सुविधा आपण देत आहात भविष्या
तही द्याव्यात अशा शुभेच्छा दिल्या,बारामती तालुक्या
तील या संघटनाची आम्हाला नक्कीच मदत होते वडगांव निंबाळकर कार्यक्षेत्रात येणारे वादतंटे ते संघटना वतीने योग्य मार्गदर्शन करत मिटवतात त्यामुळे पोलीस प्रशासन ताण बराच कमी करत असल्याने संघटनेचे केले, तसेच हॉस्पिटल प्रमुख डॉक्टर सतीश चव्हाण यांनी कार्यक्रम प्रसंगी आजी-माजी सैनिकांना मेडिकल तसेच हॉस्पिटल बिल मध्ये वीस टक्के डिस्काउंट देणार असल्याचेही सांगितले भविष्यात..... पुणे येथे आर्मी हॉस्पिटलच्या सर्व सोई सुविधा "तथास्तु आयसीयू आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल"मध्ये- उपलब्ध करू देऊ असेही त्यांनी बोलताना सांगितले,- सैनिकांसाठी आपण काहीतरी करत आहोत याचे समाधान त्यांनी बोलताना व्यक्त केले . कार्यक्रम वेळी अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर यांच्या हस्ते संघटना वतीने प्रमुख डॉक्टर सतिश चव्हाण यांचा फुल झाड देऊन सत्कार करण्यात आला.तर डॉक्टर चव्हाण यांनी पत्रकार संतोष शेंडकर व विनोद गोलांडे याचा फळझाडे देत सत्कार केला .या वेळी हॉस्पिटल मेडीकलच्या शुभांगी पवार कार्यरत असणारा सर्व स्टाफ तसेच संघटना उपाध्यक्ष भगवान माळशिकरे , सचिव पंकज कारंडे,कार्याध्यक्ष नितीन शेंडकर,खजिनदार रवींद्र कोरडे सह अन्य आजी माजी सैनिक उपस्थित होते.